Home Cities एरंडोल रवंजे गावातून ट्रॅक्टरची चोरी; गुन्हा दाखल

रवंजे गावातून ट्रॅक्टरची चोरी; गुन्हा दाखल


एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील रवंजे खुर्द येथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील रवंजे खुर्द येथील रहिवासी पांडुरंग मोहन पाटील (वय ५४) यांनी आपला ट्रॅक्टर (क्रमांक MH 19 DV 2489) नेहमीप्रमाणे घराच्या पाठीमागे असलेल्या गोठ्यात लावला होता. अज्ञात चोरट्यांनी संधी साधून गोठ्यात प्रवेश केला आणि ट्रॅक्टर लंपास केला. ही घटना बुधवारी १८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता समोर आली. त्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound