रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर तहसिल कार्यालयातुन महसूल पथकाने अवैध वाळूचे जप्त केलेले ट्रॅक्टर पळुन गेल्याची घटना आज दुपारी घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असुन याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेले वृत्त असे की, रावेर शहरात अवैध वाळु वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी यासीन तडवी, तलाठी दादाराव कांबळे व कोतवाल गणेश चौधरी यांनी सकाळी मदीना कॉलनी येथून अवैध वाळु वाहतूक करणारे ट्रक्टर-ट्रॉली नंबर MH 19 0880 पकडले व पोलिस बंदोबस्तात रावेर तहसिल कार्यालयात आणून जप्त केले. परंतु सुमारे दोन तासाने म्हणजे दुपारी दोन वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालयातुन जप्त केलेले वाळु ट्रक्टर अज्ञात चालकाने पळवुन नेले आहे. ही घटना समजताच रावेर पोलिस स्थानकात तलाठी दादाराव कांबळे यांच्या फिर्यादीवरुन ३ जणांविरुध्द गुन्ह्या दाखल करण्यात आला असून ट्रक्टर अद्याप गायब झाल आहे.