Home क्राईम वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; गुन्हा दाखल !

वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; गुन्हा दाखल !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आकाशवाणी चौक ते बसस्थानक दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली पकडण्यात आली असून, पोलिसांनी एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्च २०२६ च्या मध्यरात्री २:०० वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पथक आकाशवाणी चौक ते बसस्थानक रोड दरम्यान पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, ‘स्वातंत्र्य चौकात’ एक संशयास्पद ट्रॅक्टर येताना दिसला. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, त्यात शासनाची कोणतीही परवानगी नसलेले अवैध गौण खनिज (वाळू) भरलेले आढळून आले.

या कारवाईत पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले असून चालक गफूर बाबु तडवी वय ३६ रा. कुसुंबा ता. जळगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound