जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षांसह १५ जागांसाठी आज निवडणूकीसाठी मतदान संपन्न झाले. बार कौन्सिलच्या या निवडणुकीसाठी १०४० मतदारांपैकी ९१० म्हणजेच एकूण ८७.४१% वकिलांनी मतदान केले.
आज शुक्रवार, दि. ८ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. अध्यक्षपदासाठी जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके, किशोर भारंबे, सागर चित्रे व स्वाती निकम हे चार दिग्गज वकील निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत.
कोरोना काळात जुन्या जिल्हा वकील संघाच्या मावळत्या समितीला अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ मिळाला. त्यानंतर जाहीर झालेल्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शुक्रवारी, ८ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. शनिवारी ९ जुलै रोजी सकाळी ९ वाजेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.
जिल्हा वकील संघाच्या अध्यक्ष पदाशिवाय उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व कोषाध्यक्ष या प्रमुख पाच पदांसह दहा समिती सदस्य अशा १५ पदांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. तर उपाध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. त्यासाठी अॅड. ज्योती नेहते (भोळे) व वैशाली महाजन या दोघांत लढत होणार आहे. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. संग्राम चव्हाण, योगेश महाजन, हेमंत भंगाळे, कालिंदी चौधरी हे काम पाहत आहेत. यावेळी जिल्हा न्यायालयाच्या आवारात पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/717181179582002