अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरासह तालुक्यात रात्री मुसळधार पाऊस झाला. यात शेतातील कापसाचे मोठे नुकसान झाले आहे तर शहरातील अनेक कॉलनी भागात पिंपळे नाल्याचे पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील व ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी असणारे लहान मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत.
तर, दुसरीकडे तालुक्यात देखील हीच परिस्थिती निर्माण झाली असून, वेचणीला आलेला कापूस कापणी स आलेले मका ज्वारी बाजरी ही पीक पुर्णतः भिजल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय असे चित्र सर्वत्र दिसत आहे. अमळनेर तालुक्यातील जवळपास सर्वच मंडळ मध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.एकट्या अमळनेर शहरात काल रात्री 88 मीली पाऊस झाल्याचे वृत्त आहे.