मुंबई प्रतिनिधी । राज्यात नुकत्याच सत्तारूढ झालेल्या उध्दव ठाकरे यांच्या सरकारला आज विधानसभेत बहुमत सिध्द करावे लागणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याची मुदत दिली होती. याआधीच म्हणजे आजपासून सुरू होणार्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जाणार आहे. उध्दव ठाकरे यांच्या सरकारला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि छोटया पक्षांसह आघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.
दरम्यान, विश्वासदर्शक ठरावानंतर दुसर्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, राज्यपालांचे अभिभाषण असा कार्यक्रम मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आला. याआधी कोणताही दगाफटका नको म्हणून ठाकरे सरकारने हंगामी विधानसभाध्यक्ष कालीदास कोळंबकर यांच्या जागी दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती केली आहे.