धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या संशयित रूग्णांचा स्वॅबचा अहवाल आज दुपारी प्रशासनाला प्राप्त झाले. यात तालुक्यातून ३६ रूग्ण आढळून आले आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यात आज आढळून आलेल्या अहवालात एकुण ३६ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यात साळवा ३, बांभोरी प्रचा १, बोरखेडा १, आसोदा १, हिंगोणे बु ९, भवरखेडे ६, पाळधी खु 3, सोनवद बु १, मुसळी १, सातखेडा २, रोटवद १ तर धरणगाव शहरातील हनुमान नगर, लोहार गल्ली, भावे गल्ली, हेमइंदू नगर, बाजार पेठ, जैन गल्ली, धरणगाव या परिसरात प्रत्येकी १ असे एकुण ३६ रूग्ण आढळून आले आहे. धरणगाव तालुक्यात एकुण रूग्ण संख्या ५८९ झाली असून यापैकी ३३ जणांचा मृत्यू तर ४३६ जण बरे होऊन घरी पाठविले आहे. तर उर्वरित १२० जण उपचार घेत आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.