जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात एकूण १६ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधीक १० पेशंट हे जळगावातील तर भुसावळ आणि यावलमधील प्रत्येकी ३ पेशंटचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. दरम्यान, आजच दोन रूग्णांनी कोविडवर मात केल्याचेही यात म्हटलेले आहे.
मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाला होता. यानंतर आता नव्याने रूग्ण वाढू लागले असून प्रशासनाने लसीकरण आणि त्यातही बुस्टर डोसचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता असल्याची मागणी आता होत आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात होम आयसोलेशन केलेल्या रूग्णांची संख्या ८४ इतकी आहे.