जळगाव प्रतिनिधी । व्यसनांच्या राक्षसाची अंत्ययात्रा शहरातील शिवाजी पुतळा ते महात्मा गांधी पुतळापर्यंत काढण्यात आली होती. चेतना व्यसनमुक्ती केंद्रा तर्फे आयोजित या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अत्यंत शांत व शिस्तबद्धतेने या अंत्ययात्रेला प्रतिसाद शहरातील जनसामान्यांकडून मिळत होता.
सामान्य स्तरातील प्रत्येक व्यक्तीला आज व्यसनानी आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे आज जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखूजन्य पदार्थांची तिरडी सजवून शिवाजी पुतळा ते गांधी पुतळा ही अंत्ययात्रा निघाली होती. या अंत्ययात्रेला चेतना व्यसन मुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते, प्रवीण पाटील, नितीन रस्से, महेंद्र काबरा, ॲड. हेमंत मुग्लियार, विद्या सोनार आदी मान्यवर उपस्थित होते. सैराटच्या झिंगाट धूनिवर वाजत गाजत ही अंत्ययात्रा जनसामान्यांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू ठरली. विशाल सोनवणे, हर्षल पोतदार, प्रतीक सोनार, दीपक पाटील, सुरेश कनासे, फिरोज तडवी, शिवा जमदाळे, मो. हारिफ, शेरखान भिस्ती, सागर धनगर आदी कार्यकर्त्यांनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.