‘तो’ मृतदेह बेपत्ता योगेश सुर्यवंशीचा असल्याचे निष्पन्न

 

bepatta 1 1

यावल प्रतिनिधी । येथील फैजपुर मार्गाजवळ असलेल्या नाल्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तर तो मृतदेह कोळवद येथील (दि.25 जून) रोजी बेपत्ता झालेला योगेश सुर्यवंशी याचा असल्याचा निष्पन्न झाले आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील कोळवद येथे राहणारा योगेश सोपान सुर्यवंशी (वय-२६) हा (दि.25 जून) रोजी सकाळी ११.३० वाजता यावल येथे लक्झरी बसचे तिकिंट बुकींग करुन येतो, असे सांगून घरातून निघाला होता. मात्र तो दुपारच्या ४ वाजेपर्यंत घरी न पहोचल्याने त्याच्या कुटुंबाने सर्वत्र त्याची शोधाशोध घेण्यास सुरुवात करुन, तो मिळुन न आल्याने अखेर यावल पोलिसात योगेश हा हरवला असल्याची खबर देण्यात आली होती. मात्र फैजपूर मार्गावरील मोर धरणाच्या वसाहतीच्या शेजारी असलेल्या नाल्यात कुणीतरी अनोळखी व्याक्तिचे मृतदेह मिळुन आल्याची माहीती फैजपुर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावर पो.क उमेश पाटिल व विनोद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. तर परिसरात कुणी हरवले असल्याची नोंद झाली आहे. दि. 25 जून पासून बेपत्ता असलेला योगेश सुर्यवंशी या तरुणाची नोंद असल्याचे सांगितले. यावल येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजित ठाकरे यांनी हरवलेल्या तरुणाच्या कुटुंबास घेवुन हिंगोणा येथील घटनास्थळी तपास केलास तर योगेश असल्याची ओळख त्याच्या कुटूंबाकडून पटली असुन, त्या मृत अवस्थेत मिळालेल्या योगेश सुर्यवंशी याचा जागेवर शवविच्छेदन करून अत्यं संस्कार करण्यात आले.

Protected Content