आजाराला कंटाळून वृध्दाने स्वत:च्या पोटावर केले ब्लेडने वार; उपचारादरम्यान मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मारवड गावात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळून स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार करून पोट फाडले. त्यात त्यांना उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता घडली आहे. या संदर्भात सायंकाळी ६ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धर्मा वामन नेरकर वय-७५, रा.मारवड ता.अमळनेर असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मा नेरकर हे वृद्ध आपल्या परिवारासह अमळनेर तालुक्यातील मारवड गावात वास्तव्याला होते. दरम्यान त्यांना गेल्या काही वर्षांपासून आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांनी या आजाराला कंटाळून त्यांनी बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता घरी असताना त्यांनी घरातील धारदार ब्लेडने पोटावर वार करून पोट फाडून घेतले. त्यात ते जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी अमळनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. दरम्यान या घटनेबाबत मारवड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील केली करीत आहे.

Protected Content