जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विदगाव येथील ७० वर्षीय वृध्दाने दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरात मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, श्रीराम जीवराम कोळी (वय-७०) रा. विदगाव ता.जि.जळगाव हे पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहेत. दोन्ही मुलांसह शेतीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना एक दुर्धर आजार जडला होता. उपचार घेवून बरे होत नसल्याने आजाराला कंटाळले होते. २ एप्रिल रोजी रात्री कुटुंबासोबत जेवन करून घराच्या मागच्या खोलीत एकटेच झोपले होते. मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना राहत्या घरात गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. सकाळी पत्नी लताबाई यांना हा प्रकार लक्षात आला. गळफास घेतल्याचे पाहून कुटुंबियातील सदस्यांनी हंबरडा फोडला होता. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषीत केले. शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्न लताबाई, समाधान व देवीदास हे दोन मुले, सुना व विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरण तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय चौधरी करीत आहे.