जळगाव प्रतिनिधी । आरोपींसोबत मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक हवालदार मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे व कॉ.गोरख हिंमतराव पाटील या तिघांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. मुकेश याचा गुन्ह्यात सक्रीय सहभाग तर सुरेश सपकाळे व गोरख पाटील हे चिंग्याला सोडून घरी गेल्याने दोघांना कर्तव्यात हलगर्जीपणा करुन दुर्लक्ष करणे चांगलेच भोवले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आणखी 364 हे खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचे कलम वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी दिली. याच प्रकरणाशी संबंधित गुन्हेगार चिंंग्या व लखन मराठे या कारागृहात आहेत.
पोलीस मुख्यालयात कार्यरत पोलीस कर्मचारी अशोक पटवारी हे मद्यप्राशन करुन कर्तव्य बजावत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे गेल्या काही दिवसांपासून होत्या. त्याबाबत विभागीय चौकशी करण्यात आली विभागीय चौकशीत दोष निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पटवारी यास खात्यातून सक्तीची सेवानिवृत्तीचे आदेश देवून कारवाई केली आहे.