यावल (प्रतिनिधी) यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया अंतर्गत असलेल्या सुमारे जिल्हाभरातील ३२ अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकतेर कर्मचारी हे मागील चार महिन्यांपासून पगाराच्या प्रतिक्षेत असून पगारा आभावी कुटुंबावर अनेक संकट ओढवले असुन उपासमारी वेळ आली आहे.
यावल आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ३२ अनुदानित आश्रमशाळेच्या शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासुन पगार नसल्याकारणाने अनेक आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
पगार नसल्यामुळे बँकेतील उचल केलेल्या कर्जचे हप्ते थकीत होत आहे तर दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक किराणा दुकानदार, दुधवाले, भाजीपाला विक्रेता यांची उधारी वाढत असुन उसनवारी करुनही थकीत होत असल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीने आधीच संकटात असल्याने सर्व धंदे रोजगार पुर्णपणे ठप्प झाली असुन कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्यामुळे शिक्षक व शिक्षकतेर कर्मचाऱ्यांवर मोठी आर्थिक परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे राज्य शासनाने कर्मचाऱ्यांचे पगार त्वरीत करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.