पारोळा येथे बालाजी यात्रोत्‍सव मिरवणूकीत आज वाघाचे वहन

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा बालाजी संस्‍थानतर्फे काढण्यात येणारा बालाजी यात्रोत्‍सव मिरवणूकीत आज वाघाचे वहन असून मिती आश्विन शुद्ध ५, शुक्रवार, दि. ३० सप्टेंबर रोजी या वहनाची मिरवणुक सायं. ६ वा. निघणार आहे.

श्री बालाजी मंदिरापासून सरळ लवण गल्लीने श्री. भावसार यांच्या चक्कीवरुन दक्षिणेस मोरफळ गल्लीने, मडक्या मारुती मंदिरावरुन झपाट भवानी चौकातून पुढे शेवडी गल्लीतून क्षत्रिय आप्पांचे घरापासून परत बारी गल्लीने रमेश गोमटू बारी यांचे घरावरुन पुढे कै. शिवाभाऊ साळी यांचे घरापर्यंत येऊन परत नास्कर गल्लीने पंचमुखी हनुमान मंदीरावरुन समोर भोसले गल्लीने जैन मंदिरावरुन पश्चिमेस जडे गल्लीने कै धमके सरांच्या घरावरुन बागवान गल्लीने रमेश चौधरी पोलीस पाटील यांचे घरावरुन शिंदे गल्लीने राम मंदिर चौकातून राम मंदिर वरुन लष्कर गल्लीतून कै. गुलाबशेठ क्षत्रिय यांचे घरावरुन हिंगलाज माता मंदिरावरुन सदाशिव सोनू वाणी यांच्या घराजवळ दक्षिणेस दशरथ पाटील यांच्या घरावरुन अमळनेर रोड पुलावरुन बालाजी पार्क वरुन अमळनेर रस्त्यावरून व्यंकटेशनगर, राणी लक्ष्मीबाई नगर महामार्ग ओलांडून उंदिरखेडे रोडने शिव कॉलनी, आदर्श नगर, समता नगर, वर्धमान नगर, परत लामा ऑईल मिल वरुन मिलींद मिसर यांच्या घरावरुन पुढे गोपाल सोनार यांच्या घरावरुन डी. डी. नगर सुरेश महाजन यांच्या घरावरुन विद्या नगर कजगांव रोडने तलाव गल्ली, न. पा. चौक ते सरळ रथ चौक मार्गे मंदीरात येईल.

 

 

Protected Content