भुसावळ रेल्वे स्थानकावर तिकीट निरीक्षकास मारहाण (व्हीडीओ)


bhusawal tc marhan

भुसावळ (प्रतिनिधी) तिकीट मागितल्याचा राग आल्याने भुसावळ रेल्वे स्थानकावर तिकीट निरीक्षकास मारहाण करण्यात आल्याची घटना आज सकाळी घडली आहे. दरम्यान, संशयितांच्या परिवारातील सदस्याने मात्र,सर्व आरोप फेटाळून लावत पोलीस स्थानकात गोंधळ घातला होता.

 

या संदर्भात अधिक असे की, गाडी क्रमांक 12879 मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस भुवनेश्वर एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आली. त्यावेळी एस.के.दुबे हे तिकीट निरीक्षक या गाडीत तिकीट तपासणी करत होते. त्यावेळी एस 5 बोगीमध्ये संशयित आरोपी राजेंद्र शामसुंदर राऊत व सिद्धार्थ राजेंद्र राऊत (रा. सांताक्रूझ, मुंबई) यांच्यात व तिकीट निरीक्षक एस. के. दुबेंमध्ये तिकीटावरून वाद झाला. यावेळीत तिकीट निरीक्षक निसार मोहम्मद मोईनुद्दीन खान हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता आरोपी सिद्धार्थ राजेंद्र राऊत याने त्यांना मारहाण केली. सदरहू आरोपीस रेल्वे सुरक्षा बलाचा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणात लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मात्र राऊत परिवाराने आमच्यावर अन्याय झाला असून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपस्थित पत्रकारांसमोर सांगत होते. एवढेच नव्हे तर, लोहमार्ग पोलिसांसमोर जमिनीवर पडून आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here