भुसावळ, प्रतिनिधी | मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर कार्यरत असलेल्या तिकीट तपासणी निरीक्षकांनी ऑक्टोबर महिन्यात रेल्वेचा महसूल वाढवण्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे रेल्वेला जास्त महसूल मिळाला आहे. या उत्कृष्ट कामाबद्दल ३५ तिकीट तपासणी कर्मचार्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आर.के.शर्मा, सहाय्यक विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
त्यामध्ये मुख्य तिकिट निरीक्षक वाय.डी. पाठक, मेहबूब जंगलू, विनय ओझा, एस.के.दुबे, राजपाल सिंग, आर.के.गुप्ता, पी.एच.पाटील, संजीव जाधव, डी.के.द्विवेदी, आर.के.केशरी, शेख अल्ताफ, शेख जावेद, एस.जे.श्रीवास्तव, मो. आबिदुल्ला, रंजना संसारे, जे.के.शर्मा, ए.के.गुप्ता, पी.के.सिंग, ए.के.मिश्रा, एस.एम. पुराणिक, एम.पी.नजरकर, शेख इमरान, व्ही.एस.पाटील, एस.ए. दहीभाते, विवीयन रॉड्रिक्स, एस.पी.मालपुरे, प्रशांत ठाकूर, एफ.एस.खान, अनिल खर्चे, एम.एन.चव्हाण, वाय.आर. न्हावकर, एम.के.श्रीवास्तव, भवानी शंकर, ए.एम.खान, धीरज कुमार, अरुण कुमार मिश्रा या तिकीट निरीक्षक कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.