रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर-ट्रॉली रावेर पोलिसांनी पकडल्याने एकच खडबळ उडाली आहे. रावेर परीसरात डंपरने देखिल वाळू वाहतूक होत असते याकडेही पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी आहे.
या बाबत वृत्त असे की दि.२७ रोजी रात्री २३.३० वाजेच्या सुमारास नेहेते गावातील स्मशानभुमी जवळील रोडवर वाळू वाहतूकदार सोनालीका कंपनीचा MH- ३२ P १७०८ तर दुसरे ट्रॅक्टर सोनालीका कंपनीचे विना नंबरचा ट्रॅक्टर तर तिसरे स्वराज कंपनीचा MH-१९ AP ८८०९ असे एकूण तिघ चालका विरुध्द रावेर पोलीस स्टेशन येथे कलम ३०३ (२) प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि मनोज महाजन हे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधिक्षक जळगांव,अशोख नखाते सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर,अन्नपूर्णा सिंह पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि मनोज महाजन, पोकों सचिन घुगे,पोकों प्रमोद पाटील, पोकॉ महेश मोगरे, पोकॉ नितीन सपकाळे, पोकों चैतन्य नारखेडे यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.