जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातून चोरीच्या दुचाक्या घेवून फिरणाऱ्या तीन जणांना एरंडोल तालुक्यातील आडगाव आणि भडगाव तालुक्यातील पथराड येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या ७ दुचाक्या हस्तगत केल्या आहेत.
हेमंद उर्फ हिम्मत पाटील (वय-२६), रामकृण उर्फ रोहित संभाजी पाटील (वय-२९) दोन्ही रा. आडगाव ता.एरंडोल आणि जगदीश बाळू शेळके रा. पथराड ता. भडगाव असे अटक केल्या तीन संशयित आरोपींची नावे आहे.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाणे येथे दोन तर रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीच्या दुचाकींचा शोध घेण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की, एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील संशयित आरोपी हिम्मत पाटील हा चोरीच्या दुचाकी घेवून फिरत असल्याचे वृत्त मिळाले. त्यानुसार पोहेकॉ दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील, दिपक चौधरी, भारत पाटील अशांचे पथक रावाना झाले. आज मंगळवारी २० जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी हेमंत उर्फ हिम्मत पाटील (वय-२६) याला चाळीसगाव येथून चोरून आणलेली चोरीची दुचाकीसह अटक केली. त्याने त्याचे साथिदार रामकृण उर्फ रोहित संभाजी पाटील (वय-२९) रा. आडगाव ता.एरंडोल आणि जगदीश बाळू शेळके रा. पथराड ता. भडगाव यांचे नावे सांगितले. पथकाने या दोघांनाही अटक केली. यातील संशयित आरोपी जगदीश बाळू शेळके याच्यावर दुचाकी चोरी आणि आर्म ॲक्ट नुसार पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील कारवाईसाठी त्याला भोसरी पोलीसांनी ताब्यात घेतले तर उर्वरित दोघांना चाळीसगाव दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात चाळीसगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.