Home Cities अमळनेर किरकोळ कारणावरून तिघांवर चाकूने वार

किरकोळ कारणावरून तिघांवर चाकूने वार


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून तीन जणांना शिवीगाळ करत धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील जानवे गावात घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अमळनेर तालुक्यातील जानवे गावात विजय उर्फ भाया साहेबराव पारधी वय-४२, हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता किरकोळ कारणावरून गावात राहणारा अजय मंगल पारधी रा. जानवे ता. अमळनेर यांनी शिवीगाळ करत धारदार चाकूने विजय उर्फ भाया साहेबराव पारधी याच्यासह त्याचे नातेवाईक सुवालाल नाना पारधी आणि भास्कर बारकू पारधी यांच्यावर वार करून गंभीर दुखापत केली. तसेच जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर विजय पारधी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजता संशयित आरोपी अजय मंगल पारधी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound