Home Cities अमळनेर बांधकामावरून सळईसह चाकूने तिघांवर वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

बांधकामावरून सळईसह चाकूने तिघांवर वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । न्यायालयाने बांधकामासाठी मनाई केली आहे असे सांगितल्याच्या रागातून पती-पत्नी व मुलावर चाकूने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील सारबेटे येथे शुक्रवारी १६ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याबाबत रविवारी १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सारबेटे गावात गुलाम हुसेन खॉ अब्दुल रहेमानखॉ मेवाती वय ६९ हे आपल्या पत्नी जाकीराबी गुलाम हुसेनखॉ मेवाती आणि मुलगा सरफराजखॉ गुलाम हुसेनखॉ मेवाती यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. गुलाम हुसेनखॉ यांच्या मालकीच्या जागेवर गावातील वकीलखॉ अमिरखॉ मेवाती व त्यांचे परिवार हे बांधकामाला सुरूवात केली. त्यावेळी गुलाम हुसेनखॉ मेवाती यांची पत्नी जाकीराबी यांनी वरील ठिकाणी बांधकाम करून नका, जागा आमची आहे, कोर्टाने मनाई हकूम दिलेला आहे असे समजावून सांगितले. या रागातून वकीलखॉ अमिरखॉ मेवाती, शकीलखॉ अमिरखॉ मेवाती, जमीलखॉ अमिरखॉ मेवाती, जुनेदखॉ वकीलखॉ मेवाती, फरूखखॉ नसिबखॉ मेवाती, शाहरूखखॉ नसिबखॉ मेवाती आणि नसिबखॉ अमिरखॉ मेवाती सर्व रा. सारबेटे यांनी शिवीगाळ करत लोखंडी सळईने मारहाण केली.

पत्नीला मारहाण होत असल्याचे पाहून गुलाम हुसेनखॉ हे पत्नीला वाचविण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना देखील धारचाकून वार केल्याने त्यांच्या हाताला दुखापत केली. तसेच त्यांचा मुलगा सरफराजखॉ गुलामखॉ मेवाती याच्या पाठीवून चाकू भोसकून त्याला गंभीर जखमी केले. जखमी झालेल्यांना अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत गुलाम हुसेनखॉ मेवाती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound