Home राजकीय तिन्ही पक्षांच्या आमदारांना राज्याबाहेर हलविणार

तिन्ही पक्षांच्या आमदारांना राज्याबाहेर हलविणार

0
27

sena congress bjp

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या आमदारांना राज्याबाहेर हलविण्यात येणार आहे.

सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आमदारांसोबत चर्चा सुरू आहे. शिवसेनेची चर्चा संपली असून उध्दव ठाकरे ललीत हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. राष्ट्रवादीची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू आहे. तर काँग्रेसचीही बैठक सुरू आहे. या बैठका लवकरच संपण्याची शक्यता असून यानंतर तिन्ही पक्षाच्या आमदारांना राज्याबाहेर सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांसाठी चार्टर्ड विमाने तयार करण्यात आल्याचेही वृत्त आहे.


Protected Content

Play sound