Home राष्ट्रीय पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद



पुलवामा (वृत्तसंस्था) पुलवामा येथील दलीपोरा येथे सुरू असलेल्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

 

 

दलीपोरा येथे काही दहशतवादी असल्याची माहिती एसओजीच्या संयुक्त पथकाला मिळाली होती. त्यानंतर आज पहाटे जवानांनी या परिसराला घेरले आणि शोधमोहीम सुरू केली. शोधमोहीम सुरू असतानाचा दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले आणि चकमकीला सुरूवात झाली. दरम्यान, पुलवाम्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामामधील दलीपोरा येथे गुरुवारी चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound