तरुणावर चाकूने वार करून जखमी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एका कार्यक्रमात नाचताना धक्का लागला. यातून चौघांनी तरुणावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बाहेती महाविद्यालयासमोर घडली. याप्रकरणी मंगळवारी १८ मार्च रोजी दुपारी २ वाजता तिन संशयीतांना ताब्यात घेतले त्यात एक अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले.

जळगाव शहरातील एका कार्यक्रमात प्रथम लोंढे हा नाचत होता. त्याचा धक्का एकाला लागला. धक्का लावल्याचे मनात ठेवत दाद्या उर्फ दादू आणि त्याचा भाऊ त्याच्या सोबतचे दोन साथीदार यांनी शनिवारी दुपारी प्रथम याला महाविद्यालयाजवळील रस्त्यावर गाठले. संशयितांनी प्रथम याच्या पाठीवर, डाव्या हाताच्या बोटावर व उजव्या मांडीवर चाकूने वार करीत त्यास घायाळ केले. शिवीगाळ करत बघून घेईल, असा दम भरला. प्रत्यक्षदर्शीनी घटनास्थळी धाव घेतल्याने जखमी तरुणाचे प्राण वचाचले तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पोलिसांना जखमी तरुणाने दिलेल्या जबाबानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयितावर, रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी उपनिरीक्षक उल्हास च-हाटे यांनी तपासात शुभम गणेश सपकाळे, त्याचा भाऊ गौरव देवीदास सपकाळे आणि एक अल्पवयीन अशा तिघांना ताब्यात घतले असून त्याच्या अटकेची कारवाई रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.

Protected Content