अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बांधकामाचे सिमेंट व वाळू कालवण्यावरून एका शेतकऱ्यासह त्यांची पत्नी व मुलाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील धार येथे घडली. याप्रकरणी मारवाड पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मारवाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील शालिग्राम पाटील वय-४६ रा. धार ता. अमळनेर हे आपल्या पत्नी आणि मुलासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घराचाच बाजूला शशिकांत सखाराम पाटील यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान अंगणात पडलेले वाळू आणि सिमेंटचे कालवण सुरू असताना थोडं बाजूला करा असे सांगितले. याचा राग आल्याने सुनील शलिग्राम पाटील त्यांची पत्नी अनिता सुनील पाटील व मुलगा दिवेश सुनील पाटील या तिघांना शेजारी राहणारे शशिकांत सखाराम पाटील, पुरुषोत्तम सखाराम पाटील, दिनेश संभाजी पाटील, गणेश पुरुषोत्तम पाटील, सखाराम राजाराम पाटील, सुरेखा संभाजी पाटील, वैशाली अनंतराव पाटील आणि कल्पना पुरुषोत्तम पाटील या सर्वांनी मिळून लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून तिघांना गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवारी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली. या संदर्भात गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मारवड पोलीस ठाण्यात सुनील पाटील यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ सुनील तेली हे करीत आहे.