जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामदेववाडी येथे फटाके फोडण्यावरून महिलेसह दीर व दिराणी यांना मारहाण केल्याची घटना रविवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रेखाबाई धरमसिंग जाधव वय ४५ रा. रामदेववाडी ता.जळगाव या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी २० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता फटाके फोडण्यावरून वाद होवून रेखाबाई जाधव, त्यांचा दीर मिथून जाधव आणि दीरानी कांचन जाधव यांना गावात राहणारे मनोज शिवाजी जाधव, राजेश शिवाजी जाधव, शिवाजी जालम जाधव, विमल शिवाजी जाधव, नामदेव शिवाजी जाधव, अरूध देवीदास जाधव, खुशाल नामदेव जाधव आणि नक्कू देवीदास जाधव सर्व रा. रामदेव वाडी यांनी मारहाण केली.
याप्रकरणी रेखाबाई जाधव यांनी सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे मनोज शिवाजी जाधव, राजेश शिवाजी जाधव, शिवाजी जालम जाधव, विमल शिवाजी जाधव, नामदेव शिवाजी जाधव, अरूध देवीदास जाधव, खुशाल नामदेव जाधव आणि नक्कू देवीदास जाधव सर्व रा. रामदेव वाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.