चोरीच्या दुचाकीसह तिघे एलसीबीच्या ताब्यात; चोरीची दुचाकी हस्तगत

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणारा संशयित आरोपी आणि चोरी दुचाकी विकत घेणारे दोन संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार,  धरणगाव पोलीस ठाण्यात भाग-5 गुरनं 499/2020 प्रमाणे दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना चोरीची मोटर सायकल घेऊन संशयित आरोपी हा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक फौजदार अशोक महाजन, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, दादाभाऊ पाटील, पोलीस नाईक नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, पोलीस नाईक किरण धनगर, विनायक पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांनी कारवाई करत आज संशयित आरोपी चेतन योगेश पाटील रा.शनी मंदिर चौक पारोळा जि.जळगाव याला ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता चोरी केलेली मोटरसायकल ही साथीदार सागर रविंद्र पाटील दोन्ही रा.शनी चौक पारोळा यांनी विक्रम अरूण गायकवाड रा. पारोळा याला विकली असल्याची कबुली दिली.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रम गायकवाडला देखिल ताब्यात घेतले आहे व  चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.  तिघांवर धरणगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 

Protected Content