रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरफोडी करून मुद्देमाल लांबविणाऱ्या तीन संशयित आरोपींना रावेर पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रावेर पोलीस स्टेशन येथे 3 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्यादी रविंद्र सुरेशचंद्र अग्रवाल यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, 3 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 2 वाजता कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्याच्या घरात प्रवेश करून 1540 रुपये किंमतीचा रोख रक्कम, 5000 रुपये किंमतीचा मोबाईल, आणि 2000 रुपये किंमतीचा जुना रेडीओ चोरून नेला. एकूण 8 हजार 540 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
तांत्रीक विश्लेषण आणि गोपनिय माहितीच्या आधारे तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. यात मिटू सटवा काळे (वय-60 वर्षे, घाणेगाव जंव समर्थ कुभार, पिंपळगांव, ता. घनसावंगी, जि. जालना), संदीप बबन चव्हाण (30 वर्षे, रेल्वे स्टेशन जवळ, परतूर, ता. परतूर, जि. जालना), राकेश सिताराम काळे (40 वर्षे, मंगळुर, ता. मानोद, जि. परभणी) यांना ताब्यात घेतले. आरोपींनी सखोल तपासामध्ये घरफोडीची कबुली दिली आहे.
रावेर पोलीस स्टेशनच्या विविध गुन्ह्यांचा तपास करत असताना, पोलीस अधिकारी मपोखनि प्रिया वसावे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम तांबे, आणि अमंलदार पो.हो. सुनील बंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील कार्यवाही केली गेली. तसेच पोलीस कर्मचारी सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, श्रावण भिल यांनी या कार्यवाहीत सक्रिय सहभाग घेतला.