रावेरमधून विधानसभेसाठी काँग्रेसचे तीन इच्छुक उमेदवार मैदानात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी तयारीला लागले आहे. यात रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, ज्ञानेश्वर महाजन, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील हे इच्छुक उमेदवार असल्याचे माहिती शुक्रवारी येथील सहकारी खरेदी विक्री संघाचे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे सभागृहात काँग्रेसचे रावेर नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन तसेच इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील हे इच्छुक उमेदवार असल्याचे सांगून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितले असल्याचे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांनी सांगितले याप्रसंगी राजीव पाटील यांनी इच्छुक उमेदवारांचा काँग्रेस मधील सुमारे ४०-५० वर्षासह त्यांचे राजकीय जीवनातील कार्याचा परिचय दिला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांचा सर्व सामाजिक क्षेत्रात असलेला जनसंपर्क व त्यांचे नगराध्यक्ष काळातील विकास कामांच परिचय देत सामाजिक क्षेत्रातील त्यांची धडपड पाहता ते निश्चित निवडून येतील असा आत्मविश्वास ही व्यक्त केला. इच्छुक उमेदवार दारा मोहम्मद ज्ञानेश्वर महाजन भगतसिंग पाटील यांनी त्यांचे विचार व्यक्त केले, इच्छुक उमेदवारांनी आम्ही तीन इच्छुक उमेदवारांपैकी पक्षाने कोणासही उमेदवारी दिली तर एक दिलाने काम करण्याची व रावेर विधानसभा क्षेत्राचा विकास करणार असल्याची ग्वाही देत उमेदवाराला निवडून आणण्याची ग्वाही दिली.

या पत्रकार परिषद प्रसंगी रावेरचे आर.के.चौधरी, माजी नगरसेवक गोपाल बिरपन, यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष मुस्तफा सुब्हान खान, अन्सार खान निसार खान, हाजी इक्बाल खान निसार खान, नावरे येथील माजी सरपंच समाधान पाटील, खालील खान उपस्थित होते. विद्यमान आ. शिरीष चौधरी यांनी नुकतेच त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांना आपले राजकीय वारस म्हणून जाहीर केले. याबाबत पत्रकार परिषदेत वक्त्यांसह इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही केला आहे.

Protected Content