भुसावळ प्रतिनिधी । येथील भाजपचे नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला करून सामूहिक हत्याकांड घडविणार्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.
याबाबत वृत्त असे की, काल रात्री पावणेदहाच्या सुमारास भाजपचे रवींद्र बाबूराव खरात यांच्या कुटुंबावर हल्ला चढविण्यात आला. यात स्वत: रवींद्र बाबूराव खरात, त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात, मुलगा प्रेमसागर, रोहीत आणि गजरे नामक व्यक्ती असे पाच जण ठार झाले आहेत. तर ऋत्वीक या मुलासह पत्नी आणि दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या हल्ल्यातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींची नावे राज अख्तर खान, राजा मोघे आणि मयूर सुरवाडे अशी आहेत.