जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा आणि करंज येथील विहिरीतील विद्यूत पंपाची चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना जळगाव तालुका पोलीसांनी अटक केली आहे. तिघांवर जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आसोदा येथील ग्रामपंचायत मालकीच्या गावात पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतून अज्ञात चोरट्यांनी केबल व विद्यूत पंपाची चोरी केली होती. आणि दुसऱ्या घटनेत तालुक्यातील करंज येथील शेतकरी संजय जिवराम सपकाळे, शंकरलाल भावजी सोनवणे, भगीरथ भावजी सोनवणे आणि रविंद्र निळकंठ पाटील सर्व रा. करंज ता. जळगाव या चार शेतकऱ्यांच्या शेतातून ४ मार्च रोजी विद्यूत पंप आणि केबल चोरून नेल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनेबाबत जळगाव तालुका पोलीसात नोंद करण्यात आली होती. या दोन्ही गुन्ह्यातील जितेंद्र परल्या बारेला, जितेंद्र भगवान कोळी आणि अविनाश वसंत भील सर्व रा. अट्रावल ता. यावल या तीन संशयित आरोपींना तालुका पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १० हजार ८५० रूपये किंमतीची २५ किलो कॉपर वायर हस्तगत केली आहे. तिघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक सपकाळे, पोहेकॉ वासूदेव मराठे, ईश्वर लोखंडे, बापू पाटील, साहेबराव पाटील, संदीप पाटील, प्रशांत पाटील, बापू कोळी, जयेंद्र पाटील यांनी कारवाई केली.