धारदार शस्त्राचा धाक दाखवत वृध्दाला लुटणाऱ्या तिघांना अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा गावातील ७२ वर्षीय वृध्दाला धारदार शस्त्राचा धाक दाखवत २ हजारांची रोकड जबरी हिसकावून नेणाऱ्या तिघांना आसोदा गावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी १५ जून रोजी अटक केली आहे. वैभव विजय सपकाळे वय १९, कल्पेश निलेश इंगळे वय १९ आणि दिपक धनराज सपकाळे वय २० तिघे रा. आसोदा ता. जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाल्मीक अंकात बिऱ्हाडे वय ७२ रा. आसोदा ता. जि.जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ते असोदा ग्रामपंचायतजवळ बसले होते. तेव्हा गावातील वैभव विजय सपकाळे हा दुचाकीवर वाल्मीक यांच्याजवळ आला. त्यावेळी त्याच्यासोबत गावातील कल्पेश निलेश इंगळे व दिपक धनराज सपकाळे हेपण आले. तेव्हा वैभव विजय सपकाळे याने वाल्मीक जवळ १ हजार रुपयाची मागणी केली. तेव्हा त्यावेळी वाल्मीक यांनी माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने कल्पेश निलेश इंगळे (माळी) याने धारदार शस्त्र मानेला लावला. व पैसे देतो का नाही मादरचोद, नाहीतर तुला या हत्याराने मारुन टाकु अशी धमकी दिली. याप्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तिघे संशयित आरोपी हे फरार झाले होते. दरम्यान शनिवार १५ जून रोजी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत वैभव विजय सपकाळे वय १९, कल्पेश निलेश इंगळे वय १९ आणि दिपक धनराज सपकाळे वय २० तिघे रा. आसोदा ता. जळगाव यांना आसोदा गावातून अटक केली आहे.

Protected Content