जळगाव प्रतिनिधी । शहरातील महाबळ परिसरातील बाहेती शाळेजवळ एका हॉटेल मालकाला तीन जणांनी बंदुकीच्या धाक देवून त्याच्याकडून ४० हजार रुपये हिसकावले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरबाज दाऊद पिंजारी रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव अरबाज रऊफ पटेल (वय-२५) व मुदतसर शेख सलीम दोन्ही रा. तांबापुरा, जळगाव या असे अटक केलेल्या तीनही संशयितांची नावे आहेत. जळगाव शहरातील महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौकात गणेश दुलाराम महाजन वय ४५ हे पत्नी, एक मुलगा व दोन मुली या परिवारासह वास्तव्यास आहे. त्यांचे मालकीचे शहरातील नवीन बसस्थानक येथील साई गजानन पॅलेस नावाने हॉटेल आहे. त्यावर ते उदरनिर्वाह भागवितात. १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गणेश महाजन हे नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करुन त्यांच्या दुचाकीने घरी जात हाते. यादरम्यान महाबळ परिसरातील बाहेती शाळेजवळ त्यांच्या मागून एका बुलेटवर तीन जण आले. त्यांनी महाजन यांच्या दुचाकीसमोर बुलेट आडवी लावली. तिघांपैकी अरबाज दाऊद पिंजारी यााने पिस्तूल काढून महाजन याच्या पोटाजवळ लावले. पिस्तूलाचा धाक दाखवून तुझ्याजवळ किती रुपये आहेत, असे महाजन यांना उद्देशून पिंजारी म्हणाला. त्यानंतर पिंजारी सोबतच्या एकाने महाजन यांच्या खिशातून जबरदस्तीने ४० हजारांची रोकड काढून घेतली. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली. तर तुला जीवंत ठार मारु, अशी धमकी देवून तिघेही बुलेटवरुन पसार झाले.
याप्रकरणी महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बुधवार, १८ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अरबाज पिंजारी, अरबाज रऊफ पटेल व मुदतसर शेख सलीम या तिघा संशयितांना रामानंदनगर पोलिसांच पथकाने रात्रीतूनच अटक केली. गुरुवार, १९ ऑगस्ट रोजी तिघांना सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना शनिवार, २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास संदीप परदेशी करीत आहेत.