Home क्राईम भरवस्तीत गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुद्देमाल हस्तगत

भरवस्तीत गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक; मुद्देमाल हस्तगत


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जुना सातारा भागात किरकोळ वादातून एका व्यक्तीला जिवे मारण्याच्या हेतूने गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना ३० डिसेंबर रोजी रात्री घडली होती. नशिबाने गोळी ‘मिस फायर’ झाल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी मुख्य दोन आरोपींसह त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना बुधवारी 31 डिसेंबर रोजी सकाळी 1पी वाजता अटक केली असून, त्यांच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप मनोहर कोळेकर यांचा मुलगा आणि आरोपी यांच्यात ‘हॉटेल जलसा’ येथे जुना वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपी चंद्रकांत उर्फ बाबा विनोद चेंगट (वय २४) आणि कुंदन अनिल पठाडे (वय १९) हे दोन अल्पवयीन मुलांसह कोळेकर यांच्या घराबाहेर आले. त्यांनी शिवीगाळ करत गोंधळ घातला. फिर्यादी संदीप कोळेकर जाब विचारण्यासाठी बाहेर आले असता, आरोपी चंद्रकांत चेंगट याने कमरेचा गावठी कट्टा काढून कोळेकर यांच्यावर रोखला आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने ट्रिगर दाबला. मात्र, गोळी सुटली नाही आवाजामुळे नागरिक जमल्याचे पाहून आरोपींनी साक्षीदारांना मारहाण केली आणि तेथून पळ काढला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. काही तासांतच आरोपींना शहरात लपलेल्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा आणि जिवंत राउंड हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना २ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, अल्पवयीन बालकांना जळगाव येथील रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे.


Protected Content

Play sound