Home क्राईम घरफोडी करून सोन्याचे दागिने लांबविले ; तिघांना अटक !

घरफोडी करून सोन्याचे दागिने लांबविले ; तिघांना अटक !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील राजीव गांधी नगर भागात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनीता वामन लोखंडे (वय ३४) यांच्या घरात २५ फेब्रुवारीच्या रात्री ते २६ फेब्रुवारीच्या पहाटे दरम्यान अज्ञातांनी घरफोडी केली होती. घरातील कपाट फोडून सुमारे २ लाख ८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले होते.

तक्रार मिळताच रामानंद नगर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत समाधान लोखंडे, प्रेम संजू सकटे आणि निखिल लक्ष्मण हातगडे यांचा गुन्ह्यात सहभाग उघड झाला.

पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound