जळगाव (प्रतिनिधी) । शहरातील मेहरूण तलावाजवळील जैन कंपनीचे शेताच्या वॉल कंपाऊंड येथे दोघे दुचाकीवर बसलेले असतांना तिघांनी मारहाण करत दुचाकी व रोकड लंपास केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली होती. या घटनेतील तिघांपैकी दोघांना एमआयडीसी पोलीसांना पकडण्यात यश आले असून एक जणा फरार आहे. पोलीसांच्या ताब्यात असलेले दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, तन्मय पंकज सोनी (वय-18) रा. सिंधी कॉलनीच्या मागे, लक्ष्मीनगर आणि शिव चौधरी हे दोघे दोघे टीव्हीएस मोपेड दुचाकीवर जैन कंपनीचे शेताच्या वॉल कंपाऊंड जवळ बसले होते. तीन अनोळखी इसम आल्यानंतर तन्मय आणि शिव यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करून आरोपी रिजवान शेख उर्फ काल्या गयासोद्दीन शेख वय 22, रा.तांबापुरा याने गच्ची पकडून ठेवली तर आरोपी आग्याने तन्मयच्या खिशातील मोटरसायकलची चावी काढून घेतली तर तिसरा आरोपी सुरजितसिंग लेनसिंग टाक (वय-29), रा.शिरसोली नाका तांबापुर याने शिव चौधरी यांचे खिशातील पाचशे रुपयाची नोट काढून घेतली. मोटरसायकलवरून फरार झाले. या तिघांच्या आरोपींविरोधात तन्मय सोनी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तिघा आरोपींपैकी रिजवान शेख आणि सुरजितसिंग या दोघांना अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले. त्यापैकी आरोपी आग्या हा अद्याप फरार आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.