तरूणावर प्राणघातक हल्ला करणारे अटकेत

0
23


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील आशिक बेग असलम बेग याच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या तिघा आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, आज रोजी भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरन.२४९/२०१९ भा द वि कलम-३०७,५०४,३४ प्रमाणे २८.०४. २०१९ रोजी दाखल करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी आशिक बेग असलम बेग यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यातील आरोपी मोहम्मद उर्फ शोलू इस्माईल मोहम्मद आलम, शाकिर उर्फ गोलू सैयद रशीद व शेख दानिश शेख रझिउल्ला यांनी केला असून ते गुन्हा घडल्या पासून फरार होते. संबंधीत आरोपीबाबत पोलीस निरीक्षक देविदास पवार यांना मिळलेल्या गुप्त बातमी वरून वरील आरोपी हे भुसावळ शहरात अयान कॉलनी येथे आल्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास पवार, सपोनि राजेश शिंदे, पोना विजय पाटील, पोका विकास सातदिवे यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here