जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीत मजूर कामावर घेवून जाण्याच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याबाबत एकावर अदखलपात्र एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरिफ हारूण शेख (वय-३३) रा. अशोक किराणा जवळ रामेश्वर कॉलनी हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. शुक्रवार १३ मे रोजी आरीफ हा कामावर जाण्याच्या निमित्ताने शहरातील सिंधी कॉलनी येथे आला होता. त्यावेळी तिथे अक्षय (पुर्ण नाव माहित नाही) रा. कंजरवाडा जळगाव हा आला. आरीफला म्हणाला की तु माझे मजूर का कामावर घेवून जातो, असे बोलून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून जमीनीवर लोटून दिले. शिवीगाळ करून जर पोलीसात जाऊत तक्रार दिली तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. आरीफ शेख याने रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून अक्षयवर एमआयडीसी पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहे.