Home क्राईम किरकोळ कारणावरून तरूणासह कुटुंबाला संपविण्याची धमकी

किरकोळ कारणावरून तरूणासह कुटुंबाला संपविण्याची धमकी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उपवनसंरक्षण कार्यालयात विरोधात अर्ज दिल्याचा कारणावरून एका तरुणाची शिवीगाळ करून कुटुंबाला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश अरुण भुतेकर वय-३४, रा. चिखली जि. बुलढाणा हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान त्याने २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जमीर मुनीर शेख रा. उपवनसंरक्षण कार्यालय, जळगाव यांच्या विरोधात अर्ज केला होता. या रागातून जमीर मुनीर शेख याने रमेश भुतेकर याला शिवीगाळ करत कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनिवारी १८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार जमीर मुनीर शेख रा. उपवन संरक्षण कार्यालय, जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound