जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोर उसनवारीने दिलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरून एकाच्या दुचाकीला धडक देत शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, विनोद सुभाषचंद्र जैन वय-५२, रा. बळीराम पेठ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता ते जळगाव शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळ येवून संशयित आरोपी योगेश दिलीप पाटील याला त्यांनी उसनवारीने घेतले पैसे मागितले. या कारणावरून योगेश पाटील याने त्यांच्या दुचाकीची धडक देऊन त्यांना दुचाकीवरून खाली पडत त्यांना शिवीगाळ केली. तर तसेच तुला जीवेठार मारेल अशी धमकी दिली. याप्रकरणी गुरुवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नरेश सोनवणे करीत आहे.