पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीला धमकी देत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील एका भागात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील कैलास उर्फ गोलू धनराज चौधरी (वय-१९) हा तरूण गेल्या दोन महिन्यांपासून मुलीच्या संपर्कात राहून माझ्याकडून मोबाईल घे व माझ्याशी फोनवर बोल नाहीतर तुला मारून टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी ५ जून रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी काकाच्या घरी असतांना कैलास चौधरी हा घरात अनधिकृतपणे प्रवेश करून मुलीचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्याने घटनास्थळाहून पसार झाला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कैलास उर्फ गोलू धनगर चौधरी याच्या विरोधात पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला पोलीसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे करीत आहे.



