अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | दिवाळीसह पाडव्याला येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात देशभरातील भाविकांचा अलोट जनसागर उसळल्याचे दिसून आले आहे.
दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिराला देशभरातील भाविकांनी भेट देत हवनात्मक पूजा, अभिषेक केले,देव दर्शन घेतले. विशेष पौराणिक महत्त्व असलेल्या पाडव्याच्या दिवस आणि शासकीय सुटी यामुळे आयुष्यात सारे काही मंगल व्हावे यासाठी देशाच्या कानाकोपर्यातून आलेल्या भाविकांमध्ये तरुण वर्गाचा मोठा समावेश होता, हे विशेष.
आदल्या दिवशीच म्हणजेच सोमवारी अनेक भाविक मंदिरात मुक्कामी होते. मंगळ ग्रह सेवा संस्थेने त्यांची उत्तम बडदास्त राखली होती.पहाटे पाच वाजेपासून अभिषेक, पूजा व दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांच्या अलोट गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होेते. काल रात्री उशीरापर्यंत हजारो भाविकांनी मंगळग्रह मंदिरात दर्शन घेतले. लक्षणीय बाब म्हणजे यात महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर, भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून मंगळग्रह देवस्थानाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.