यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर मतमोजणीच्या दिवशी विजयी उमेदवाराची कार्यकर्त्यांनी काढलेल्या मिरवणूकी बुरुज चौकात मशीद जवळ गालबोल लावण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामुळे गावात शांतता राहावी व कायदा व सुव्यवस्थेला तळा जाऊ नये म्हणून यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी शांतता कमिटीची तातडीने मीटिंग बोलावून हिंदू मुस्लिम बांधवांचा जो गैरसमज होता तो शांततेत तोडगा काढून गावात शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या प्रमुख शांतता समितीची बैठकीत सांगितले की, आपापल्या धर्माचे सण उत्सव आपल्या पध्दतीने शांततेत उत्साहात साजरी करावी, गावातील वातावरण चिघळणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, नव्हे तर सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रत्येक धर्माच्या बुजुर्ग लोकांनी तरुणांना समजवावे, जर कोणी आगाऊपणा करत असेल तर त्याचा कायद्याने समाचार घेतला जाईल. तसेच परिस्थिती हाताबाहेर गेल्यास दोन्ही बाजूच्या फिर्यादी दाखल झाल्यास २५ वर्षे कोर्टात फिरावे लागतं. त्यामुळे तरुणांनी अशा भांडण पासून दूर राहावं जेणेकरून त्यांनी करिअर खराब करून घेऊ नये पोलिसांकडे झालेल्या सर्व प्रकारची शूटिंग उपलब्ध आहे पोलीस त्यावर अभ्यास करत आहेत असेही पी आय प्रदीप ठाकूर यांनी यावेळी आपलं मत स्पष्ट केलं याप्रसंगी हिंदू मुस्लिम समाजातील दोघं पार्टीच्या बांधवांनी आपापले मतं स्पष्ट केले.
याप्रसंगी शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान यांनी आपापल्या मशिदी जवळ ज्या त्या कार्यकर्त्यांनी उभे राहून हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये वाद होणार नाही व हिंदू समाजाचे लोक नेहमीच मशिदी जवळ बँड बंद करून जात असतात. आपल्या मुस्लिम तरुणांनी याचा बोध घेणे गरजेचे आहे. शहरांमध्ये हिंदू आणि मुस्लिम गेल्या अनेक वर्षापासून कायम असून हे दोघ जाती धर्मातील नागरीकांमध्ये जातीय सलोखा व बंधुभाव तसेच विविध व्यवहारांमध्ये देखील एकत्र काम करतात. याचाही भान सर्वांनी ठेवावे असे सांगितले. तर पुंडलिक बारी यांनी हिंदू मुस्लिम बांधवांच्या संदर्भात उदाहरण दिली. तर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांनी शहरातील जे भाग संवेदनक्षमशील आहे. अशाच ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्वरित कॅमेरे बसवून त्यानंतर कोणीही असो कायदा हातात घेणाऱ्यांना कायद्याचे हवाली करावे असे सांगितलं तर शिवसेनेचे उबाटा गटाचे शरद कोळी यांनी आता निवडणुका संपले आहे. एकमेकाचे उणेधुणे व्हाट्सअप च्या माध्यमातून जे काढले जाते ते यापुढे कोणी करू नये याबाबत सूचना केली याप्रसंगी शांतता समितीच्या सदस्यांचा शंभर ते दीडशे तरुण उपस्थित होते.