Home राजकीय ही तर लोकशाहीची हत्या ! -गिरीश महाजन

ही तर लोकशाहीची हत्या ! -गिरीश महाजन

0
28

मुंबई । रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून माजी मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करत, ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलंय.  

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे.  या प्रकरणी राज्य सरकारचा गिरीश महाजन यांनी देखील निषेध केला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी’द्वारे लोकशाहीची हत्या! लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे, असे ट्विट गिरीश महाजन यांनी केले आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका मांडली म्हणून अर्णब गोस्वामींविरूद्ध महाविकासआघाडी सरकारतर्फे सूडबुद्धीने केलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध!, असेही महाजन यांनी म्हटलंय.

 


Protected Content

Play sound