स्टॉकहोम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्वीडनने आपल्याच देशातील नागरिकांना देश सोडण्याची ऑफर दिली आहे. स्वीडनमध्ये अजूनही देश सोडण्यासाठी पैसे दिले जातात. यापूर्वी हा नियम केवळ परदेशातून आलेल्या आणि स्वीडनमध्ये स्थायिक होणाऱ्या नागरिकांना लागू होता, मात्र नव्या तरतुदीनुसार हा नियम नैसर्गिकरित्या जन्मलेल्या नागरिकांनाही लागू होणार आहे. स्वीडनच्या इमिग्रेशन मंत्री मारिया मलमार स्टेनगार्ड यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.
ज्यांना स्वीडिश संस्कृती आवडत नाही किंवा ज्यांना इथे आत्मसात करता आलेले नाही ते स्वीडन सोडून जाऊ शकतात, असे स्टेनगार्ड म्हणाल्यात. सध्याच्या नियमांनुसार, स्वीडिश नागरिकांनी देश सोडल्यास त्यांना 10 हजार स्वीडिश क्रोन (80 हजार रुपये) मिळतात. मुले देश सोडून गेल्यावर 40 हजार रुपये मिळतात. याशिवाय त्यांना भाड्याचे पैसेही मिळतात. देश सोडण्यापूर्वी त्यांना हे पैसे एकाच वेळी मिळतात.