मुंबई वृत्तसंस्था | तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर क्रॅश होऊन काही दिवसांपूर्वी १४ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मात्र ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली ? याविषयी प्रश्न उपस्थित झाले होते. या संदर्भात उच्चस्थरिय तपासातून या दुर्घटनेचं कारण समोर आले आहे.
दि.८ डिसेंबर २०२१ झालेल्या या हेलिकॉप्टर दुर्घटनाप्रकरणी एअरफोर्सच्या चौकशी समितीचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून दुर्घटनेचं कारण समोर आले आहे. त्यानुसार हॅलिकॉप्टरमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता. किवा कुठला कट, दुर्लक्ष हे अपघाताचं कारण असून अचानकपणे बदललेल्या हवामानामुळे हेलिकॉप्टरचा मार्ग भरकटून त्यामुळेच हा अपघात झाला आहे.
दि.८ डिसेंबर २०२१ झालेल्या दुर्घटनेचा एअरफोर्सच्या चौकशी समितीने बारकाईने अभ्यासातून फ्लाइट डाटा रिकॉर्डर आणि कॉकपिट व्हाइस रिकॉर्डरचे विश्लेषण पूर्ण झालं. याप्रकरणाची कोर्ट ऑफ इंक्वॉयरीमध्ये रिकॉर्डिंगचे विश्लेषण करण्यात आले. यातून या दुर्घटनेचं कारण समोर आले आहे.