तरूणावर चाकूहल्ला करणारा तिसरा संशयित अटकेत

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील २३ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून तीन जणांनी बेदम मारहाण करून चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिसरा आरोपी भावेश पोपट पाटील (वय-२४) रा. खेडी ता. जि.जळगाव याला २७ डिसेंबर रोजी रात्री एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, धनराज गजानन कोळी (वय-२३) रा. हुडको खेडी बुद्रुक ता. जि. जळगाव हा खाजगी वाहन चालवून आपला कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. गुरुवार १६ डिसेंबर रोजी रात्री धनराज कोळी हा परभणी येथून गाडी खाली करून रात्री ११ वाजता जळगावात आला. त्यानंतर खेडी बुद्रुक येथे  वाहन त्याच्या घराच्या बाजूला लावून घराकडे जात होता. त्यावेळी जुन्या वादातून भावेश पोपट पाटील, संदीप पोपट पाटील आणि शिवाजी पाटील सर्व रा. खेडी बुद्रुक ता. जि. जळगाव यांनी जुन्या वादाचा रागातून धनराज कोळी याला शिवीगाळ करू लागले. याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील भावेश पाटील याने चाकू काढून धनराजच्या डाव्या हाताच्या दंडावर व पोटाच्या एका बाजूला चाकूने वार करून जखमी केले.

 

याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील  संदीप पाटील आणि शिवाजी पाटील यांना २२ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलीसांनी अटक केली होती. तर यातील तिसरा संशयित आरोपी  भावेश पोपट पाटील (वय-२४) याला एमआयडीसी पोलीसात सोमवारी २७ डिसेंबर रोजी मध्यरात्री अटक केली आहे.  पुढील तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहे.

Protected Content