यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथे २९ ऑगस्ट रोजी २१ वर्षीय तरुण इमरान युनुस पटेल यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार वाढवे हे करत असून, त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश खोंडे, पोलीस कॉन्स्टेबल सागर कोळी, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील यांचे पथक वेगाने काम करत आहे. या पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत यावल शहरातून तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे. या आधी या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली होती.

दहिगावामध्ये दोन तरुणांनी निर्दयीपणे इमरान पटेलचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा लगेचच कामाला लागली होती. या प्रकरणात तिसऱ्या आरोपीच्या अटकेमुळे पोलिसांच्या तपासाला अधिक गती मिळाली आहे.



