जळगाव प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ हद्दीतील गोपाळपुरा हनूमान मंदीरासमोर तरूणाची पार्किंगला लागवलेली ३५ हजार रूपये किंमतीची दुचाकी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, संतोष नामदेव गव्हाणे (वय-३८) रा. गोपालपुरा हनुमान मंदीर, शनीपेठ हा तरूण मजुरी करून उदरनिर्वाह करतो. ४ एप्रिल रोजी पहाटे १ ते ४ वाजेच्या सुमारास मंदीरासमोर लावलेली (एमएच १९ सीटी ७५८१) क्रमांकाची ३५ हजार रूपयेकिंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करून दुचाकी मिळून आली नाही. याप्रकरणी बुधवारी रात्री संतोष गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रघुनाथ महाजन करीत आहे.