लॅपटॉप लुटण्यासाठी चोरटयांनी विद्यार्थींनीवर टाकला ज्वलनशील पदार्थ

कल्याण-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कल्याण येथे युपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर ज्वलनशील पदार्थ टाकून तिला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात ज्वलनशील पदार्थामुळे तरूणी जखमी झाली असून तिच्या अंगावरचे कपडे जळाले आहेत. त्या मुलीजवळची लॅपटॉपची बॅग हल्लेखोर पसार झाले आहे. कल्याण पूर्वेतील लोकग्राम पार्किंग प्रभाग परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, कल्याणच्या लोकग्राममध्ये राहणाऱ्या मित्राला लॅपटॉप देण्यासाठी अंधेरीवरून आलेल्या पीडित तरुणीवर लोकग्रामच्या मोटरसायकल पार्किंगमध्येच ज्वलनशील पदार्थ टाकण्यात आला. तिच्या जवळील लॅपटॉप लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. या तरुणीच्या अंगावर कास्टिक सोडा टाकण्यात आला. तरूणीला यामुळे कोणतीही गंभीर इजा जरी झाली नसली तरी तिची ओढणी आणि कपडे मात्र ज्वलनशील पदार्थामुळे जळाले. या तरूणीवर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Protected Content